HC On Freedom Of Speech: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये’; भगवान शिवविरोधातील आक्षेपार्ह पोस्टवर उच्च न्यायालयाची टिप्पणी

या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, अर्जदार एक सुशिक्षित व्यक्ती आहे. त्याला त्याच्या कथित पोस्ट आणि टिप्पण्यांचा परिणाम चांगल्या प्रकारे माहित आहे, तरीही त्याने अपमानास्पद पोस्ट केल्या.

HC On Freedom Of Speech: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये’; भगवान शिवविरोधातील आक्षेपार्ह पोस्टवर उच्च न्यायालयाची टिप्पणी
Court (Image - Pixabay)

सोमवारी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने भगवान शिव आणि भगवान नंदी यांच्या विरोधात फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट केल्याच्या आरोपावरून कलम 295A, 153A आणि 505 (2) अंतर्गत एफआयआरचा सामना करणार्‍या एका डॉक्टरचा अटकपूर्व जामीन नाकारला. अर्जदार (डॉ. नदीम अख्तर) याच्यावर आरोप आहे की, एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अपमानास्पद पोस्ट केल्या आहेत. अख्तरने त्याच्यावरील एफआयआरविरोधात न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता.

या प्रकरणावर निर्णय देताना न्यायमूर्ती वीरेंद्र सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केले की, अर्जदार एक सुशिक्षित व्यक्ती आहे. त्याला त्याच्या कथित पोस्ट आणि टिप्पण्यांचा परिणाम चांगल्या प्रकारे माहित आहे, तरीही त्याने अपमानास्पद पोस्ट केल्या. न्यायालयाने पुढे नमूद केले की, समाजात राहताना प्रत्येक व्यक्तीने समाजातील इतर सदस्यांच्या धार्मिक श्रद्धेचा आदर केला पाहिजे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये’. न्यायालयाने डॉ. नदीम अख्तर याची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2023 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).