HC on Cruelty: 'पतीची कोणतीही चूक नसताना पत्नीने सारखे घर सोडून जाणे ही क्रूरता'; Delhi High Court ने मंजूर केला घटस्फोट

या जोडप्याचे 1992 मध्ये लग्न झाले होते. पुढे पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यानंतर पतीने 2017 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मात्र कौटुंबिक न्यायालयाने 2022 मध्ये त्याची घटस्फोटाची याचिका फेटाळली,

HC on Cruelty: पतीची कोणतीही चूक नसताना पत्नीने सारखे सासरचे घर सोडून जाणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याच आधारावर न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायालयाने म्हटले, या प्रकरणात प्रतिवादी म्हणजेच पत्नीने वेळोवेळी अपीलकर्ता म्हणजेच पतीची कोणतीही चूक नसताना आपले घर सोडले आहे. हे मानसिक क्रूरतेचे कृत्य आहे. त्यामुळे पतीचा घटस्फोट मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, विवाह हा परस्पर सहकार्य, समर्पण आणि निष्ठेवर टिकतो.

अहवालानुसार, या जोडप्याचे 1992 मध्ये लग्न झाले होते. पुढे पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्यानंतर पतीने 2017 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मात्र कौटुंबिक न्यायालयाने 2022 मध्ये त्याची घटस्फोटाची याचिका फेटाळली, त्यानंतर त्याला उच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागले. उच्च न्यायालयासमोर, त्याने आरोप केला की, त्याच्या पत्नीचे वर्तन अनियमित होते, तसेच तिने किमान सहा वेळा घर सोडले आहे. याच आधारावर न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. (हेही वाचा: VIDEO: पतीसोबत प्रियकरालाही घरात ठेवण्याचा महिलेचा आग्रह; प्रेमासाठी 3 मुलांची आई चढली विजेच्या खांबावर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now