Hathras Stampede: हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू; सरकारचे चौकशीचे आदेश

आयोजन समितीसह स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातून मागवण्यात आला आहे.

Hathras Stampede: हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू; सरकारचे चौकशीचे आदेश
भोले बाबा

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. सिकंदरराव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन यामध्ये महिला आणि लहान मुलांसह 116 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीपी आणि गृह सचिव घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी लोकसभेतही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. हाथरस घटनेत मोठ्या कारवाईची तयारी सुरू आहे. आयोजन समितीसह स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातून मागवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी हाथरस येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. (हेही वाचा: Hathras Stampede: जाणून घ्या कोण आहेत भोले बाबा, ज्यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी गमावला आपला जीव)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2024 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).