Haryana Shocker: जिंदच्या सरकारी शाळेतील 142 अल्पवयीन मुलींचा मुख्याध्यापकावर सहा वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आरोपीला अटक
उल्लेखनीय आहे की, सुमारे 15 मुलींनी यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चद्रचूड, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग आणि इतरांना या कथित भयंकर कृत्यांबाबत पत्रे लिहिली होती.
हरियाणातून मुलींवरील लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या जिंदमधील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या तब्बल 142 अल्पवयीन मुलींनी मुख्याध्यापकावर सहा वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. बुधवारी एएनआयशी बोलताना, जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा म्हणाले, ‘उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने एकूण 390 मुलींचे जबाब नोंदवले आहेत. मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे 142 घटनांच्या तक्रारी पाठवल्या आहेत. या 142 मुलींपैकी बहुतांश मुलींनी मुख्याध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला तर बाकीच्यांनी या भीषण कृत्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले. आरोपी मुख्याध्यापक सध्या तुरुंगात आहे.’
उल्लेखनीय आहे की, सुमारे 15 मुलींनी यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चद्रचूड, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग आणि इतरांना या कथित भयंकर कृत्यांबाबत पत्रे लिहिली होती. 13 सप्टेंबर रोजी हरियाणा महिला आयोगाने या पत्राची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी ते जिंद पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणात 30 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केला. आरोपीला 4 नोव्हेंबर रोजी अटक करून 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, आरोपी मुख्याध्यापकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार; 2 जण अटकेत)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)