Gurugram: G20 शिखर परिषदेसाठी लावलेल्या फुलांच्या कुंड्यांची आलिशान गाडीतून चोरी (Watch Video)

हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून लोक ही या व्हिडीयोवर मजेदार कमेंट करत आहेत.

Gurugram: G20 शिखर परिषदेसाठी लावलेल्या फुलांच्या कुंड्यांची आलिशान गाडीतून चोरी (Watch Video)

गुरुग्राममधून (Gurugram) समोर आलेल्या एका हायप्रोफाईल चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसत की दोन हाय प्रोफाईल लोक एका आलिशान कारमध्ये आले आणि गुरुग्रामच्या सहरोल सीमेवर थांबले. गाडीतून खाली उतरताच दोघांनी शहराच्या सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या उचलण्यास सुरुवात केली. आणि मग एकामागून एक दोघांनी आपल्या गाडीत अनेक फुलांच्या कुंड्या भरल्या. आणि नंतर घटनास्थळावरुन पसार झाले. हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) झाला असून लोक ही या व्हिडीयोवर मजेदार कमेंट करत आहेत.

पहा व्हिडीयो -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2023 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).