IPL Auction 2025 Live

Gujarat Election 2022: अहमदाबाद येथील भव्य रोड शोमध्ये रुग्णवाहिकेसाठी थांबला PM Narendra Modi यांचा ताफा

सायंकाळी 5.20 वाजता सुरू झालेल्या 'रोड शो'मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा वर्षाव करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (1 डिसेंबर) अहमदाबादमध्ये सुमारे 54 किलोमीटरचा रोड शो केला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी मागून येणाऱ्या एका रुग्णवाहिकेला रस्ता दिला. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधानांचा ताफा खूप वेगाने पुढे जात असतानाच मागून एक रुग्णवाहिका आली. पंतप्रधानांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ सक्रिय होऊन ताफ्याला थांबवून रुग्णवाहिकेला रस्ता दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यामधून रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'रोड शो'ला गुरुवारी सायंकाळी नरोडा गावातून सुरुवात झाली. सायंकाळी 5.20 वाजता सुरू झालेल्या 'रोड शो'मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा वर्षाव करून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. खास तयार केलेल्या वाहनावर उभे राहून पंतप्रधानांनी गर्दीला अभिवादन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)