Guinness World Records: ओडिशामधील तरुणाने ट्रेडमिलवर 12 तास धावून पूर्ण केले 68 किलोमीटरचे अंतर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद (Video)
त्याने 12 तासात सुमारे 68 (42.27 मैल) किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे.
इतरांपेक्षा काहीतरी वेगळे, आश्चर्यकारक असे काही करून दाखवण्याची इच्छा व्यक्तीला काहीही करायला लावू शकते. असाच एक पराक्रम ओरिसातील एका तरुणाने केला आहे. हा तरुण ट्रेडमिलवर न थांबता तब्बल 12 तास धावला आहे व त्याद्वारे त्याने विश्वविक्रम करून इतिहास रचला आहे. सुमित कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. त्याने 12 तासात सुमारे 68 (42.27 मैल) किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. या यशाबद्दल त्याला प्रमाणपत्र मिळाले असून, तो ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी मानतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमित कुमार हा बसंती कॉलनी, राउरकेला, ओडिशाचा रहिवासी आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो. ट्रेडमिलवर न थांबता 65 किमी अंतर कापण्याचे सुमितचे लक्ष्य होते, पण ट्रेडमिलवर धावत त्याने 12 तासांत 68 किमीचे अंतर कापले. सुमित हा ऍथलेटिक खेळाडू आहे, त्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. (हेही वाचा: रिक्षावर डान्स करणाना तोल गेला, नशीबाने थोडक्यात बचावला Watch Video)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)