GST Collections for November: नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल संकलनाचा आकडा 1.46 लाख कोटीवर; गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 10.9 टक्के वाढ

वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 20 टक्के अधिक आहे

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनाचा आकडा 1,45,867 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर 11 टक्के वाढ झाली आहे. सलग नऊ महिन्यांपासून जीएसटी महसूल संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 20 टक्के अधिक आहे आणि देशांतर्गत व्यवहारांपेक्षा (ज्यात सेवांच्या आयातीचा समावेश आहे) 8 टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी  महसूल 1,45,867 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी 25,681 कोटी रुपये, राज्य जीएसटी 32,651 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 77,103 कोटी रुपये होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)