Goa New COVID Restrictions: गोवा मध्ये सिनेमा हॉल ते River Cruises 50% क्षमतेने सुरू राहतील; जाणून घ्या गोव्यात प्रवेशासाठी काय असतील निर्बंध?

omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

गोवा मध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. यामध्ये  आता गोव्यात प्रवेश करताना कोविड19 लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 15 दिवस पूर्ण झालेले असणं बंधनकारक आहे. किंवा 24 तास कोविड टेस्ट केल्यानंतर ती निगेटिव्ह असल्यास त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच गोवा मध्ये कसिनो, सिनेमा हॉल, ऑडिटोरियम, रिव्हर क्रुझ,वॉटर पार्क अशी मनोरंजनाची ठिकाणं 50% क्षमतेनेच सुरू ठेवली जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)