Goa Assembly Elections: 2022 मध्ये भाजपा पूर्ण आणि आश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

गोव्यामध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत

Devendra Fadnavis | (File Photo)

गोव्यामध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस गोव्यातील भारतीय जनता पक्षाची निवडणूक रणनीती आणि तयारीची पाहणी करण्यासाठी 20 सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. आता 2022 मध्ये भाजपा पूर्ण आणि आश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

'मजबुत सरकार, मजबुत संघटन घेऊन भाजपा या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल आणि ऐतिहासिक विजय आम्ही संपादन करू. देशाला पुढे नेण्याचे काम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्याच नेतृत्त्वात होऊ शकते, हे जनतेला कळाले आहे. काँग्रेससमोर अस्तित्त्वाचे संकट आहे, नेतृत्त्वाचे संकट आहे. आप केवळ पोस्टरबाजीत व्यस्त आहे. राज्य चालवायला आचार, विचार आणि नीती लागते.' असेही ते म्हणाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)