गाझियाबाद येथे Bhatia Modh Flyover बस कोसळून भीषण अपघात, 2 दुचाकी अडकल्या; 3 जण जखमी
या बसमध्ये 7-8 प्रवासी प्रवास करत होते.
नोएडाहून गाझियाबादकडे येणारी बस टायर फुटल्यामुळे भाटिया मोड उड्डाणपूलवरुन खाली पडून भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. "या बसमध्ये 7-8 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात 2 दुचाकी बसखाली अडकल्या असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत," अशी माहिती गाझियाबदचे एसएसपी पवन कुमार यांनी दिली.
पहा ट्विट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)