Ghaziabad: कारची रस्त्यावर कुत्र्याला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
रस्त्यावरुन जाताना पाळीव कुत्र्याला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गाझियाबाद येथील इंदिरापुरमच्या नीती खांड 1 परिसरात घडला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सशल मीडियावरही व्हायरल झाल आहे.
रस्त्यावरुन जाताना पाळीव कुत्र्याला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गाझियाबाद येथील इंदिरापुरमच्या नीती खांड 1 परिसरात घडला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओ सशल मीडियावरही व्हायरल झाल आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंदिरापुरम कोतवाली परिसरातील नितीखंडा ए मध्ये 11 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता कुत्रा सोसायटीत फिरत होता. यावेळी सोसायटीतील रहिवासी दानपेटी घेऊन जात होते. कार चालकाने निष्काळजीपणे कुत्र्याला धडक दिली आणि घटनास्थळावरुन पळून गेला असा आरोप आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. एसीपी इंदिरापुरम स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितले की ते ड्रायव्हरचा शोध घेत आहेत, लवकरच त्याला पकडले जाईल.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)