General Upendra Dwivedi यांनी स्वीकारला आज Indian Army chief चा पदभार

भारतीय लष्कराचे 30 वे लष्करप्रमुख आज जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पदभार स्वीकारला आहे.

General Upendra Dwivedi | X

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारतीय लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते भारतीय लष्कराचे 30 वे लष्करप्रमुख आहेत. ते याआधी भारतीय लष्कराचे उपप्रमुख होते आणि त्यांनी उत्तरी लष्कराचे नेतृत्वही केले होते. Gen Manoj Pande यांच्यानंतर आता द्विवेदी यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गतिमान दहशतवादविरोधी कारवाया करण्यातही जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या कमांडचे आधुनिकीकरण आणि सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.