GauriKund Landslide: केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन; 13 जण बेपत्ता
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी स्वतः जातीने या दुर्घटनेचा आढावा घेत आहेत.
केदारनाथ मध्ये नैसर्गिक आपत्तीचा पुन्हा मोठा फटका बसल्याचं समोर आलं आहे. यात्रा मार्गावरच भूसखलन झालं असल्याने 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गौरीकुंड भागात जोरदार पावसात दरड कोसळली आहे. यामध्ये 19 जण गायब असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 3 मृतदेह हाती आले आहेत. यात्रा मार्गावरील दुर्घटनेमध्ये भाविक वाहून गेल्याची किंवा दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी स्वतः जातीने या दुर्घटनेचा आढावा घेत आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)