Mukhtar Ansari: अवधेश राय हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारीला आजीवन कारावास आणि एक लाखाचा दंड

Mukhtar Ansari (PC - ANI)

गँगस्टर मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) वाराणसीने एमपी-एमएलए कोर्टाने 32 वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी  कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत मुख्तार अन्सारी यांना मरेपर्यंत  जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. शिक्षा सुनावल्यानंतर अन्सारीने वयाचा विचार करता शिक्षा कमी करण्याची मागणी केली. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement