Free Haleem Offer Causes Chaos: हैदराबादमध्ये मोफत हलीम घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज (Watch Video)
त्यामुळे शेकडो लोक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. गर्दी खूप वाढली आणि काही वेळातच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
Free Haleem Offer Causes Chaos: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. अशात अनेक ठिकाणी खास दावतीचे आयोजन केले जाते. नुकतेच हैदराबादच्या मलकपेठ येथील रेस्टॉरंटनेही मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती. मात्र मोफत हलीम घेण्यासाठी एवढी गर्दी जमली की, पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले आणि लाठीचार्ज करावा लागला. अहवालानुसार, आज सकाळी हैदराबादच्या मलकपेट येथील रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम प्राप्त करण्यासाठी कथितपणे जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने पोलिसांना पाचारण केले, त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
रमजानच्या पहिल्या दिवशी रेस्टॉरंटने मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेकडो लोक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. गर्दी खूप वाढली आणि काही वेळातच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मालकपेठ पोलिसांनी हॉटेल मालकावर उपद्रव आणि वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Karnataka Shocker: मंगळुरूमध्ये महिलेची वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण, जमिनीवर ढकलले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अटक)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)