Karnataka Fire: कर्नाटकातील फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, 3 जण जखमी
अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तीन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी फटाक्यांच्या गाडी खाली करतानाअट्टिबेले-होसूर हद्दीतील गोदामाला अचानक आग लागल्याने फटाक्याचे गोदाम जळून खाक झाले आणि काही शेजारील दुकाने आणि नऊ वाहनांचे नुकसान झाले. आगामी दीपावली सणासाठी गोदामात लाखो रुपयांचे फटाके साठवले होते, ते आगीच्या संपर्कात येऊन स्फोट होऊ लागले. आग पसरण्याआधीच लोकांनी सुरक्षिततेसाठी बाहेर पळ काढला आणि दाट धुराचे लोट निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तीन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement