Fire at Durga Puja Pandal: दुर्गा पूजा पंडालमध्ये आरतीच्या वेळी भीषण आग; जवळजवळ 42 जण जखमी (Watch)

या आगीत भाजलेल्या 32 जणांना वाराणसी BHU मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

भदोही दुर्गा पूजा पंडालमध्ये आरतीच्या वेळी भीषण आग लागली आहे. या आगीत 42 जण सापडले आहेत. यामध्ये महिला व मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या आगीत भाजलेल्या 32 जणांना वाराणसी BHU मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले असून, 9 जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी पंडालमध्ये शेकडो लोक उपस्थित होते. ही घटना औरई कोतवाली परिसरातील घडली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now