Fact Check: येत्या 15 एप्रिलपासून लागू होणार नवीन तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग वेळा? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, IRCTC ने जारी केले स्पष्टीकरण
दावा केला जात आहे की, 15 एप्रिलपासून तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ रेल्वे तिकिटांच्या बुकिंग वेळेत बदल होणार आहे. यासोबत नवीन वेळांचे वेळापत्रकही दिले आहे. मात्र आता या व्हायरल सोशल मीडिया पोस्ट भारतीय रेल्वेने फेटाळून लावल्या आहेत.
सध्या सोशल मिडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, 15 एप्रिलपासून तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ रेल्वे तिकिटांच्या बुकिंग वेळेत बदल होणार आहे. यासोबत नवीन वेळांचे वेळापत्रकही दिले आहे. मात्र आता या व्हायरल सोशल मीडिया पोस्ट भारतीय रेल्वेने फेटाळून लावल्या आहेत. इंडियन टेक अँड इन्फ्रा ऑन एक्स नावाच्या पेजने नवीन वेळेचा दावा केला आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र, आयआरसीटीसीने स्पष्ट केले की एसी किंवा नॉन-एसी क्लासच्या तत्काळ बुकिंग वेळापत्रकात कोणताही अधिकृत बदल करण्यात आलेला नाही. वेळेत असा कोणताही बदल सध्या प्रस्तावित नसल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी एसीसाठी सकाळी 10 आणि नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 वाजता परवानगी असलेल्या बुकिंग वेळा कायम आहेत. एजंट बुकिंगच्या वेळा देखील बदलल्या नाहीत. रेल्वेने पुनरुच्चार केला की, फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास वगळता सर्व क्लासमध्ये तत्काळ बुकिंग उपलब्ध आहे. (हेही वाचा: RRB ALP Recruitment 2025: रेल्वेमध्ये होणार तब्बल 9,970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; आजपासून करू शकाल अर्ज, जाणून घ्या पात्रता, अर्ज व निवड प्रक्रिया)
तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग वेळेबाबत भारतीय रेल्वेचे स्पष्टीकरण-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)