Fact Check: उर्दूमध्ये 'हॅलो' म्हणत मुस्लीम समाजाला आकर्षित करून घेत आहेत Aaditya Thackeray? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या पोस्टरमागील सत्य
हा एका बिलबोर्डचा फोटो असून, ज्यावर उर्दूमध्ये 'हॅलो' असे लिहिलेले आहे
सध्या आदित्य ठाकरे यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा एका बिलबोर्डचा फोटो असून, ज्यावर उर्दूमध्ये 'हॅलो' असे लिहिलेले आहे. या बिलबोर्डवर आदित्य ठाकरे दिसत आहेत. सध्या अशा या बिलबोर्डचा फोटो व्हायरल करून, आदित्य ठाकरे मुस्लीम समाजाला आकर्षित करून घेत असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र हा फोटो 2019 च्या निवडणुकीवेळचा असल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी उर्दू सोबतच मराठी, हिंदी, तेलगू भाषेतील तत्सम जाहिरात फलक लावण्यात आले होते.