Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान सुकमा-कांकेरमध्ये चकमक, अनेक नक्षलवादी ठार

घटनास्थळावरून एके 47 जप्त करण्यात आली आहे. परिसराचा शोध मोहिम सुरू आहे. काही नक्षलवादी जखमी किंवा मृत झाल्याची शक्यता आहे. सुकमा येथे मतदान सुरू असताना पडेराच्या दक्षिण भागात दुपारी एकच्या सुमारास पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली.

Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

सुकमाच्या ताडमेटला आणि दुलेद दरम्यान सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. कोब्रा 206 बटालियनच्या जवानांशी चकमक सुरू आहे. मीनपा येथील मतदान पार्टीला सुरक्षा देण्यासाठी हे सैनिक जंगलात तैनात करण्यात आले होते. यामध्ये काही जवान जखमीही झाल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचेही वृत्त आहे.

घटनास्थळावरून एके 47 जप्त करण्यात आली आहे. परिसराचा शोध मोहिम सुरू आहे. काही नक्षलवादी जखमी किंवा मृत झाल्याची शक्यता आहे. सुकमा येथे मतदान सुरू असताना पडेराच्या दक्षिण भागात दुपारी एकच्या सुमारास पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. 2-3 मृतदेह घेऊन माओवादी पळताना दिसले. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि ओढल्याच्या खुणाही आढळून आल्या. सर्व सैनिक सुरक्षित असून जवळपास शोध मोहीम सुरू आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement