Earthquake in Gujarat: गुजरातच्या भावनगरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 3.1 इतकी मोजली गेली तीव्रता
अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.
Earthquake in Gujarat: गुजरातमधील भावनगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 इतकी मोजली गेली. त्याचा परिणाम अनेक भागात दिसून येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंप रात्री 9.52 वाजता झाला. अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही. याआधी जानेवारी महिन्यात गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी मोजली गेली. (हेही वाचा: Monsoon Prediction For 2024: यंदाचा मान्सून भारतासाठी सामान्य- स्कायमेट)