Earthquake in Assam: कामरूप येथे आज दुपारी 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कोणतीही हानी नाही
स्थानिक वेळेनुसार कामरूप येथे दुपारी 4.52 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला.
आसाममध्ये सोमवारी दुपारी 3.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार कामरूप येथे दुपारी 4.52 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. गुवाहाटीच्या बाहेरील भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूटान आणि बांगलादेशच्या काही भागांव्यतिरिक्त मेघालयातील शेजारच्या री-भोई जिल्ह्यात 4.7-रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. मात्र, या घटनेत कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. (हेही वाचा: गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनला आग; Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)