E Cash Card: भारतीय नौदल आणि स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन येणार खास ई-कॅश कार्ड; ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये काम करणार

भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजासह विविध युद्धनौकांवर याची चाचणी घेण्यात आली आहे,

E Cash Card

भारतीय नौदल (Indian Navy) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) एक अद्वितीय ई-कॅश कार्ड आणणार आहेत. हे कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये काम करू शकेल. हे कार्ड स्वावलंबन सेमिनारमध्ये (Swavlamban Seminar) लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजासह विविध युद्धनौकांवर याची चाचणी घेण्यात आली आहे, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: Meta Big Action In India: Facebook आणि Insta वरील कंटेंटबद्दल मेटाची भारतात मोठी कारवाई; तब्बल 19 दशलक्षाहून अधिक वाईट कंटेंट काढला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)