Delhi Crime: दिल्लीत MCD शाळेच्या भिंतीजवळ आढळला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पीडिता आणि गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी अनेक पथके कार्यरत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात दिल्ली महानगरपालिका (MCD) संचालित शाळेजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह एका वाटसरूला आढळून आला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक पथके, गुन्हे अन्वेषक आणि दीनदयाल उपाध्याय (DDU) रुग्णालयातील वैद्यकीय व्यावसायिकांना तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी रवाना करण्यात आले. हा हत्येचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. प्राथमिक तथ्यांच्या आधारे, आयपीसी कलम 302/201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित आणि गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी अनेक पथके कार्यरत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)