Delhi Shocker: दिल्लीत कापड दुकानाच्या मालकावर गोळीबार; मदतीसाठी आलेल्या मुलांवर चाकूहल्ला (Watch Shocking Video)

या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला असून, यात हल्लेखोर हातात बंदूक घेऊन हल्ला करताना दिसत आहेत.

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात एका रेडिमेड कपड्याच्या दुकानदारावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी दुकानदाराला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या मुलावर हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला, तर दुसऱ्या मुलालाही मारहाण करण्यात आली. जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला असून, यात हल्लेखोर हातात बंदूक घेऊन हल्ला करताना दिसत आहेत. दुकानदाराचा मुलगा सारिक अन्वर याने सांगितले की, त्यांचे लक्ष्मीनगर येथील रमेश पार्कमध्ये कपड्यांचे दुकान आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ते दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना शस्त्रधारी काही हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी वडील गुड्डू अन्सारी यांची विचारपूस करून दुकानाची तोडफोड सुरू केली. यावेळी गल्लीतील त्यांचे दुसरे दुकान बंद करून वडील इकडे येत माहिती हल्लेखोरांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वडिलांवर गोळीबार केला. (हेही वाचा: हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर हृदयद्रावक घटना; निचितपूर गेटवर 25 हजार व्होल्ट वायर अंगावर पडून सहा जणांचा होरपळून मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement