Delhi Crime: बनावट फेसबुक अकाउंट व व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांची लाखोंची फसवणूक; दिल्लीत चार जणांना अटक

हे लोक आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांची फसवणूक करत होते. बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून आणि आंतरराष्ट्रीय व्हॉट्स अॅप नंबरवरून कॉल करून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने आरोपी लोकांना फसवत असे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

दक्षिण दिल्ली पोलिसांनी मंगळवारी भारतीय आणि नायजेरियन नागरिकांसह सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांची फसवणूक करत होते. बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून आणि आंतरराष्ट्रीय व्हॉट्स अॅप नंबरवरून कॉल करून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने आरोपी लोकांना फसवत असे. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना एका 62 वर्षीय महिलेकडून या संदर्भात तक्रार मिळाली होती. एका अज्ञात व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. नंतर, त्या व्यक्तीने चॅटिंगसाठी एक आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप नंबर शेअर केला. काही दिवसांनंतर, त्याच व्यक्तीने तिला आयफोन, सोन्याचा मुलामा असलेले घड्याळ इत्यादी मौल्यवान भेटवस्तू देऊ केल्या. त्यानंतर विमानतळावरून या मौल्यवान वस्तू सोडण्यासाठी शुल्क भरावे लागेल असा खोटा कॉल करून महिलेकडून 27 लाख रुपये लुबाडले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement