Delhi Foot Over-Bridge Collapsed: दिल्लीत फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी झाली नाही, पाहा व्हिडिओ

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रक ललिता पार्कजवळ पुस्ता रोडवर पोहोचला तेव्हा क्रेनचा एक भाग फूट ओव्हर ब्रिजला धडकला, ज्यामुळे तो अर्धवट कोसळला.

पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात मालवाहू ट्रक घेऊन जाणाऱ्या क्रेनची धडक बसल्याने एक फूट ओव्हर ब्रिज अंशत: कोसळला, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा ट्रक अक्षरधाम मंदिर परिसरातून बुरारीकडे क्रेन घेऊन जात असताना हा अपघात झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रक ललिता पार्कजवळ पुस्ता रोडवर पोहोचला तेव्हा क्रेनचा एक भाग फूट ओव्हर ब्रिजला धडकला, ज्यामुळे तो अर्धवट कोसळला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement