दादरमधील आंदोलनात पोलिसांवर संतापलेल्या महिलेचे संजय राऊतांकडून कौतुक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर येथे झालेल्या निदर्शनादरम्यान एका महिलेने तैनात पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी त्या महिलेचे कौतुक केले आहे.

नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर परिसर व राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दादर येथील आंदोलनादरम्यान एका जागेवरून बाजूला होण्यास सांगितल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेचा पोलिसांवर प्रचंड संताप अनावर झाला.

त्या महिलेने उपस्थित पोलिसांना थेट सुनावत आपले आक्रमक मत मांडले. "आम्हाला तुमच्याकडून संरक्षण नको आहे, तर आम्हाला तुमच्यापासूनच संरक्षणाची गरज आहे," अशा शब्दांत तिने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सामान्य नागरिक जेव्हा मदतीसाठी किंवा सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात जातात, तेव्हा त्यांना तासनतास ताटकळत ठेवले जाते. मात्र नागरिक स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक केली जाते, असा आरोपही तिने या वेळी केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement