AstraZeneca ची Covishield की Bharat Biotech ची Covaxin भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांनी कोणती COVID-19 Vaccine घेतली होती? (Watch Video)

1 मार्च 2021 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी Bharat Biotech ची Covaxin घेतली आहे. तर त्यांनी दुसरा डोस8 एप्रिलला एम्स मध्ये घेतला होता.

PM Narendra Modi | (File Image)

AstraZeneca ने माहिती दिल्यानुसार, कोविड 19 ची लस Covishield आणि Vaxzevria यांचा Thrombosis with Thrombocytopenia Syndrome हा दुर्मिळ असा साईड इफेक्ट असू शकतो. युके स्थित फार्मा कंपनीच्या मते TTS मध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात आणि प्लेटलेट्स ची संख्या कमी होते. या दाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती लस घेतली याची चर्चा सुरू झाली आहे. 2021 चा व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यात एम्स दिल्ली मध्ये पंतप्रधान मोदी लस घेताना दिसत आहेत. 1 मार्च 2021 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी Bharat Biotech ची Covaxin घेतली आहे. तर त्यांनी दुसरा डोस8 एप्रिलला एम्स मध्ये घेतला होता, त्यांनी पूर्वीच्या ट्वीटर आणि आताच्या X वर केलेल्या पोस्ट मध्ये 'कोरोना वायरसवर मात करण्यासाठी लसीकरण हा एक पर्याय असल्याचं' म्हटलं आहे. नक्की वाचा: AstraZeneca च्या Covid लसीचे होतात साइड इफेक्ट्स, कंपनीने स्वतः केले मान्य .

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती कोविड लस घेतली?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now