Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमध्ये वडिलांचा पोटच्या मुलीवर 6 वर्षे बलात्कार; मुलगी गरोदर, कोर्टाने आरोपीला सुनावली 101 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

मोहम्मदवर सुमारे 6 वर्षांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदरही राहिली होती.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमधील मल्लपुरम येथील एका विशेष जलदगती न्यायालयाने मोहम्मद नावाच्या (आरोपीचे नाव बदलले आहे) 43 वर्षीय व्यक्तीला आपल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 101 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मोहम्मदला न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मोहम्मदवर सुमारे 6 वर्षांपासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदरही राहिली होती. पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत 101 वर्षांची शिक्षा सुनावली. गुन्हा दाखल झाला तेव्हा पीडितेचे वय 16 वर्षे होते. ती 10 वर्षांची असल्यापासून वडील मोहम्मद तिच्यावर अत्याचार करत होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पीडितेने तिच्या आजोबांनी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला होता. (हेही वाचा: Massage Services at Candolim Beach: कँडोलिम बीचवर अनधिकृत मसाज सेवा; तीन महिलांवर गुन्हा दाखल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)