Coronavirus Updates: भारतात कोरोना व्हायरस संसर्गाचे 3,325 नवे संक्रमित; देशभरात सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा 44,175 वर

भारतामध्ये कोरोनाव्हायरस (Covid-19) सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आज (मंगळवार, 2 मे 2023) सक्रीय रुग्णसंख्या 47,246 वरून 44,175 पर्यंत घसरली आहे.

Coronavirus Updates: भारतात कोरोना व्हायरस संसर्गाचे 3,325 नवे संक्रमित; देशभरात सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा 44,175 वर
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोनाव्हायरस (Covid-19) सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आज (मंगळवार, 2 मे 2023) सक्रीय रुग्णसंख्या 47,246 वरून 44,175 पर्यंत घसरली आहे. कोविड रुग्णंची संख्या 4.49 कोटी (4,49,52,996) इतकी नोंदवली गेली आहे. हे प्रमाण आता एकूण संक्रमणांपैकी 0.11 टक्के आहे. राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर 98.71 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,77,257 वर पोहोचली आहे तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 12:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).