काँग्रेस खासदार Rajani Patil राज्यसभेतून निलंबित; सभागृहात रेकॉर्डिंग केल्याचा आरोप
ते म्हणाले की, रजनी अशोकराव पाटील या सभागृहातील कामकाजाचे रेकॉर्डिंग करताना आढळून आल्या आहेत.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे. सभागृहाच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सभापती जगदीप धनखर यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, रजनी अशोकराव पाटील या सभागृहातील कामकाजाचे रेकॉर्डिंग करताना आढळून आल्या आहेत. ही बाब गंभीर आहे. या सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित एक व्हिडिओ आज ट्विटरवर सार्वजनिक डोमेनमध्ये प्रसारित करण्यात आला. मी ते गांभीर्याने घेतले आणि आवश्यक ती कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी केली जाईल, असे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सांगितले आणि विशेषाधिकार समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत डॉ. रजनी अशोकराव पाटील यांना चालू अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)