CM Uddhav Thackeray On Ahmednagar Civil Hospital Fire Incident: अहमदनगर मध्ये रूग्णालयाच्या ICU वॉर्ड आग प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदारंवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ही दुर्घटना आज सकाळी 11च्या सुमारास घडली आहे. आग ही शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अहमदनगर मध्ये सिव्हिल रूग्णालयाच्या ICU वॉर्ड मध्ये लागलेल्या आगीत 10 कोरोना बाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून या दुर्गघटनेबाबत सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.तसेच या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
CMO Maharashtra ट्वीट
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 6, 2021
राजेश टोपे ट्वीट
या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2021 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

