Chennai: डॉक्टरांनी 5 वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसातून बाहेर काढला LED Bulb; ओपन सर्जरीशिवाय पार पडली प्रक्रिया

श्री रामचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बल्ब बाहेर काढल्यानंतर सहज श्वास घेण्यास सक्षम असलेल्या मुलाला दोन दिवसांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.

Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, ज्यामध्ये एका 5 वर्षांच्या मुलाने एलईडी बल्ब गिळला होता व आता डॉक्टरांनी तो त्याच्या शरीरातून बाहेर काढला आहे. या मुलाने खेळताना चुकून एलईडी बल्ब गिळला, जो त्याच्या फुफ्फुसात जवळपास महिनाभर राहिला. आता डॉक्टरांनी छातीच्या ओपन सर्जरीशिवाय तो बाहेर काढला. श्री रामचंद्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बल्ब बाहेर काढल्यानंतर सहज श्वास घेण्यास सक्षम असलेल्या मुलाला दोन दिवसांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. एप्रिलमध्ये, मुलाने तो खेळत असलेल्या खेळण्यातील कारमधून हा एलईडी बल्ब गिळला होता. आता तीन बालरोग शल्यचिकित्सक आणि तीन भूलतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टीमने ब्रॉन्कोस्कोप- कॅमेरा आणि प्रकाशाने सुसज्ज लवचिक ट्यूब, वापरून हा बल्ब बाहेर काढला. (हेही वाचा: Man Dies Of Heart Attack At Gym: वाराणसी येथे जिममध्ये वॉर्मअप करताना व्यक्तीला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)

पहा पोस्ट-