CEO’s Passport Stolen by Ex-employee: कामावरून काढून टाकल्याचा राग; माजी कर्मचाऱ्याने चोरला सीईओ Vishwa Nath Jha यांचा पासपोर्ट आणि युएस व्हिसा

थकीत पगाराबाबत कायदेशीर नोटीसही पाठवल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे, मात्र कंपनीकडून नोटीसला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

Saarthi AI Logo, CEO Vishwa Nath Jha Profile Picture (Photo Credit: Official Website, LinkedIn)

CEO’s Passport Stolen by Ex-employee: आजकाल जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरु आह्रे. भारतामध्येही अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. नुकतेच देशातील सारथी एआय नावाच्या कंपनीतही अशीच नोकर कपात झाली, मात्र आपल्याला कामावरून काढल्याचा राग मनात ठेऊन कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने चक्क सीइओ विश्व नाथ झाचा यांचा पासपोर्ट चोराला. या पासपोर्टमध्ये यूएस व्हिसाही होता. नवा पासपोर्ट मिळवण्यात झा यांना यश आले आहे, मात्र नव्या अमेरिकन व्हिसाची प्रतीक्षा फार जड ठरत आहे. या घटनेमुळे झा यांना कंपनीसाठी नवीन निधी मिळवून देण्यासाठी परदेशात प्रवास करता आला नाही. अहवालानुसार, सारथी एआयने 2023 पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 140 वरून 40 पर्यंत कमी केली आहे.

झा यांनी कबूल केले की सारथी एआयने गेल्या 2 आर्थिक वर्षांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने टीडीएस जमा केलेला नाही. झा म्हणाले, ‘आम्ही कंपनी चालवण्यासाठी आणि विद्यमान संघाचे वेतन देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत आणि लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडू.’ (हेही वाचा: Cognizant Offering 2.5 LPA to Freshers: कॉग्निझंटने फ्रेशर्सना ऑफर केले वार्षिक 2.5 लाख रुपयांचे पॅकेज; नेटीझन्सनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली)

पहा पोस्ट-