Bus Driver Dies While Driving: बेंगळुरू येथे प्रवाशांनी भरलेली बस चालवताना चालकाला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Video)

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, कंडक्टरने तात्काळ ड्रायव्हरच्या सीटवर बसून बसचा ताबा घेऊन बस थांबवल्याचे दिसत आहे.

Representational Image (File Photo)

Bus Driver Dies While Driving: बेंगळुरू शहरात बुधवारी बीएमटीसी बस चालवत असताना एका 40 वर्षीय चालकाला हृदयविकाराचा झटका आला, परिणामी त्याचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही घटना सकाळी 11 वाजता नेलमंगला येथून दसनपुरा येथे जात असताना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, कंडक्टरने तात्काळ ड्रायव्हरच्या सीटवर बसून बसचा ताबा घेऊन बस थांबवल्याचे दिसत आहे. किरण कुमार असे मृत चालकाचे नाव आहे. ड्युटीवर असताना कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले. कंडक्टर ओबलेश यांनी धाडस दाखवत तात्काळ गाडी सुरक्षितपणे थांबवली, त्यामुळे सर्व प्रवासी बचावले आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही. यानंतर ओबलेश यांनी कुमारला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. यानंतर बीएमटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुमार यांच्या कुटुंबाला भेट दिली आणि अंतिम संस्कारासाठी आर्थिक मदत देऊ केली. (हेही वाचा: Meerut Shocker: मेरठमध्ये 3 वर्षाच्या निष्पाप मुलीचा कारमध्ये लॉक करून पार्टी करायला गेला तरुण; 4 तासांनंतर झाला गुदमरून मृत्यू, गुन्हा दाखल)

Bus Driver Dies While Driving:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)