Building Balcony Collapse in Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना; जगन्नाथ रथयात्रेदरम्यान इमारतीची बाल्कनी कोसळली, अनेकजण जखमी (Watch Video)

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील दरियापूर काडिया नाक्याजवळ एका इमारतीची बाल्कनी कोसळून ही दुर्घटना घडली.

Building Balcony Collapse in Ahmedabad

अहमदाबादमध्ये भगवान जगन्‍नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे.  रथयात्रेदरम्यान घराची बाल्कनी तुटल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. लोक इमारतीच्या बाल्कनीत उभे राहून रथयात्रा पाहत होते. यावेळी अचानक तिसऱ्या मजल्यावरची बाल्कनी तुटून खाली पडली. अपघाताच्या वेळी बाल्कनीत लहान मुले आणि महिलाही उभ्या होत्या. अचानक झालेल्या अपघातामुळे सर्वजण खाली पडले. ही बाल्कनी तुटून खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडली. या अपघातामध्ये 15-20 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील दरियापूर काडिया नाक्याजवळ एका इमारतीची बाल्कनी कोसळून ही दुर्घटना घडली. (हेही वाचा: Pune: टॉवेलने खेळत असताना नकळत लागला फास; 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कात्रज येथील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement