'मला भेटायचे असेल तर तुमचे आधार कार्ड घेऊन या'; भाजप खासदार Kangana Ranaut ने बनवला नवा नियम (Video)

कंगनाने असेही सांगितले की, जर हिमाचलच्या उत्तरेकडील लोकांना तिला भेटायचे असेल तर ते मनालीतील तिच्या घरी येऊ शकतात, तर मंडीतील लोक शहरातील तिच्या कार्यालयात येऊ शकतात.

Kangana Ranaut (PC - Instagram)

Kangana Ranaut Asks Visitors to Bring Aadhaar Card: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन खासदार बनलेली चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आता कंगना रणौतने तिला भेटायला येणाऱ्या लोकांनी आपले आधार कार्ड सोबत आणावे, असा आदेश जारी केला आहे. तसेच भेटायला येणाऱ्या लोकांना त्यांच्या भेटीचा उद्देश कागदावर लिहावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कंगना म्हणाली की, तिला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्यांच्या भेटीचा उद्देश कागदावर लिहावा लागेल जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. ती पुढे म्हणते, हिमाचल प्रदेशात खूप पर्यटक येतात, त्यामुळे भेटायला येणाऱ्या लोकांकडे मंडी परिसराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

कंगनाने असेही सांगितले की, जर हिमाचलच्या उत्तरेकडील लोकांना तिला भेटायचे असेल तर ते मनालीतील तिच्या घरी येऊ शकतात, तर मंडीतील लोक शहरातील तिच्या कार्यालयात येऊ शकतात. कंगनाच्या आधार कार्डबाबतच्या या आदेशाविरुद्ध काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. हिमाचलचे काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले, ‘एका लोकप्रतिनिधीने केवळ आपल्या संसदीय मतदारसंघातील लोकांना भेटणे आणि आधार कार्ड घेऊन त्यांना भेटण्यासाठी बोलावणे योग्य नाही.’ (हेही वाचा: Samvidhaan Hatya Diwas: देशात 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा होणार; केंद्राची घोषणा, 1975 मध्ये याच दिवशी लागू झाली होती आणीबाणी)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)