मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला माजी मॉडेल Divya Pahuja हिचा जामीन; गँगस्टर Sandeep Gadoli मृत्यू प्रकरणात 7 वर्षे भोगला तुरुंगवास

न्यायमूर्ती पीडी नाईक यांनी पाहुजाला जमीन मंजूर करताना, तिने सात वर्षांचा प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे आणि अटक करण्यात आली तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती या गोष्टींचा विचार केला.

Divya Pahuja

गँगस्टर संदीप गडोली हा 2016 मध्ये कथित चकमकीत मरण पावला होता. आता या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या माजी मॉडेल दिव्या पाहुजा हिला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. संदीपला मारण्यासाठी हरियाणातील पोलिसांसोबत कट रचल्याचा गुन्हा दाखल असलेल्या पाहुजावर, संदीपचा ठावठिकाणा पुरवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ती त्याच्यासोबत होती. आता न्यायमूर्ती पीडी नाईक यांनी पाहुजाला जमीन मंजूर करताना, तिने सात वर्षांचा प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे आणि अटक करण्यात आली तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती या गोष्टींचा विचार केला.

अर्जदार एक महिला आहे आणि ती सुमारे 7 वर्षांच्या कालावधीसाठी कोठडीत आहे आणि पुढे लवकरच हा खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही. घटनेच्या वेळी अर्जदाराचे वय सुमारे 18 वर्षे होते. या सर्व तथ्यात्मक बाबींचा विचार करून, अर्जदाराला काही अटींवर जामीन दिला जाऊ शकतो, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. मुंबई उच्च न्यायालयासमोर पाहुजा हिची ही तिसरी जामीन याचिका आहे. (हेही वाचा: Penetration in Rape Case: 'केवळ पेनिट्रेशनचा पुरावा पुरेसा, वीर्य आढळले नाही म्हणून बलात्काराचा दावा खोटा ठरत नाही'- Delhi High Court)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)