Gujarat BJP Leader Killed: भाजपा पदाधिकारी शैलेश पटेल मंदिराबाहेर पत्नीची वाट पाहत असताना अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी
शैलेश पटेल यांच्या पत्नीने मारेकर्यांचा चेहरा पाहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यावरून आता पुढील तपास करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती भाजपचे वापी तालुक्याचे उपाध्यक्ष शैलेश पटेल होते. त्यांची हत्या रता गावात सकाळी 7 च्या सुमारास गोळ्या झाडून करण्यात आली. ते मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. पटेल हे ड्रायव्हरच्या सीटवर असताना अचानक मोटारसायकलवरील दोन व्यक्ती कारजवळ आल्या आणि त्यांनी त्यांच्यावर अगदी जवळच्या अंंतरावरून 2-3 गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. Mankhurd Murder Case: मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल .
पहा ट्वीट
BJP office bearer in Gujarat’s Valsad district was shot dead by unknown assailants, police said https://t.co/EOkPqPBKtA
— Hindustan Times (@htTweets) May 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

