Former MP CM Shivraj Singh: शिवराज चौहान यांना भेटल्यावर महिलांना रडू आवरेना, भावूक व्हिडिओ व्हायरलछत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. मात्र, यश मिळूनही या पक्षाला मुख्यमंत्री पदाचा तिढा प्रदीर्घ काळ सोडवता आला नव्हता. दरम्यान, प्रदीर्घ खल केल्यानंततर अनुक्रमे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यात मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा पक्षाने निवडला. आता राजस्थानचा प्रश्न मात्र अद्यापही मागेच राहिला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे एक केंद्री निरीक्षक पथक राजस्थानमध्ये दाखल झाले आहे. ज्यामध्ये राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांचा समावेश आहे. या पथकाचे स्वागत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केले आहे. (हेही वाचा, )

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)