Bihar Shocker: बिहारमधील बाढ स्थानकावर आई आणि मुलांवरून गेली ट्रेन, थोडक्यात जीव वाचला (Watch Video)
स्थानकावर गर्दी असल्याने महिला आपल्या दोन मुलांसह फलाटावरून खाली पडली. संपूर्ण ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली. यावेळी महिलेने दोन्ही मुलांना छातीजवळ धरले. तिघांचेही प्राण थोडक्यात बचावले.
बिहारमधील बाढ रेल्वे स्थानकावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एक महिला आपल्या दोन मुलांसह ट्रेनमध्ये चढत असताना रेल्वे रुळावर पडली. यावेळी ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या दोन मुलांसह दिल्लीला जाण्यासाठी विक्रमशिला एक्स्प्रेस पकडण्यासाठी बाढ स्टेशनवर आली होती. मात्र, स्थानकावर गर्दी असल्याने महिला आपल्या दोन मुलांसह फलाटावरून खाली पडली. संपूर्ण ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली. यावेळी महिलेने दोन्ही मुलांना छातीजवळ धरले. तिघांचेही प्राण थोडक्यात बचावले.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)