Bihar Shocker: मुझफ्फरपूरमध्ये प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात; मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून कापला प्रायव्हेट पार्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या कुटुंबियांना हे नाते मान्य नव्हते. एके दिवशी या मुलीने तरुणाला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले.

Bihar Shocker: मुझफ्फरपूरमध्ये प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात; मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण करून कापला प्रायव्हेट पार्ट
प्रातिनिधिक प्रतिमा

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप आलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने प्रेयसीचा भाऊ आणि आई-वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या कुटुंबियांना हे नाते मान्य नव्हते. एके दिवशी या मुलीने तरुणाला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले. या तरुण प्रेयसीच्या घरी गेल्यानंतर तिच्या कुटुंबाला याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्नही केला. दुसरीकडे, तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, हा तरुण त्यांच्या घरात गुपचूप घुसला होता आणि मुलीसोबत अश्लील कृत्य करताना त्याला पकडले होते. (हेही वाचा: Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये कपलचा अजून एक किळसवाणा व्हिडिओ आला समोर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).