Bhubaneswar Shocker: मालकाच्या घरातून मोलकरणीने चोरली 1 लाख रुपयांची रोकड; CCTV मध्ये कैद झाली घटना (Watch)
घरातील सीसीटीव्हीत एक महिला रोख रक्कम चोरताना दिसत आहे.
जर का तुम्हीही पार्श्वभूमी तपासल्याशिवाय लोकांना आपल्या घरात मदतनीस म्हणून ठेवत असाल तर सावध व्हा. यामुळे तुमच्या मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम धोक्यात येऊ शकते. भुवनेश्वरमधील लक्ष्मी सागर हद्दीतील झारपाडा जगन्नाथ नगर रोड परिसरात अशीच चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका मोलकरणीने आपल्या मालकाच्या कपाटातून लाखो रुपयांची रक्कम चोरली आहे. घरातील सीसीटीव्हीत एक महिला रोख रक्कम चोरताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिभू प्रसाद महापात्रा यांनी मामी पात्रा नावाच्या एका महिलेला मासिक 4000 पगारावर घरात कामाला ठेवले होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने ते घरात रोख रक्कम ठेवत असत. एके दिवशी त्यांना त्यातील एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले, तेव्हा मोलकरणी वॉर्डरोबमधून सुमारे एक लाख रुपयांची रोकड चोरताना दिसून आली. चोरीनंतर कुटुंबीयांनी लक्ष्मीसागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (हेही वाचा: No Passenger Lifts for House Maids, Delivery Boys: 'घरातील मदतनीस, डिलिव्हरी बॉय आणि कामगारांनी पॅसेंजर लिफ्ट वापरल्यास होणार दंड'; हाऊसिंग सोसायटीच्या नोटिशीवर टीका, पोस्ट व्हायरल)