बेंगळुरू शहरातील मल्लेश्वरम भागात (ट्विटरवर नोंदवल्याप्रमाणे) एका वार्षिक साडी सेलवेळी दोन महिला साडीवरून एकमेकींशी जोरदार भांडताना दिसल्या. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, म्हैसूर सिल्क साडीच्या वार्षिक सेलवेळी दोन महिला साडी खरेदीवरून तुफान मारामारी करत आहेत. या शॉपिंग इव्हेंटमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेचे केस ओढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, फुटेजमध्ये एक पोलीस अधिकारी आणि इतर काही जण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. (हेही वाचा: Idli With Misal: मिसळ सोबत इडली खाणारी महिला झाली ट्रोल, ट्विटरवर लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया)

पहा महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)