Bengaluru Shocker: टेक कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने केली एमडी आणि सीईओची तलवारीने हत्या; आरोपी फरार, तपास सुरु

सध्या दोघांवर हल्ला करणारा फेलिक्स नावाचा माजी कर्मचारी फरार असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खुनाच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

बेंगळुरूमध्ये हत्येचे एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका टेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची एका माजी कर्मचाऱ्याने कथितरित्या हत्या केली आहे. कार्यालयात असताना माजी कर्मचाऱ्याने दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही व्यक्ती एरोनिक्स इंटरनेट कंपनीचा माजी कर्मचारी होता. त्याने एमडी फणींद्र सुब्रमण्य आणि सीईओ विनू कुमार यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला.

सध्या दोघांवर हल्ला करणारा फेलिक्स नावाचा माजी कर्मचारी फरार असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. खुनाच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आरोपी फेलिक्स आधी एरोनिक्स इंटरनेटमध्ये काम करायचा. ती नोकरी सोडून त्याने स्वतःची टेक कंपनी सुरू केली. मात्र, जुन्या कंपनीमधील वरिष्ठ लोक त्याच्या व्यवसायात अडथळा आणत होते. या कारणामुळे फेलिक्सचा त्यांच्यावर खूप राग होता. रागाच्या भरात त्याने मंगळवारी कंपनीच्या कार्यालयात तलवार घेऊन घुसून फणींद्र व वीणू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळ काढला. (हेही वाचा; Bihar Horror: बिहारमध्ये 45 वर्षीय महिलेची बेदम मारहाण करून हत्या; डोळे बाहेर काढले, जीभ व स्तन कापले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now