Bengaluru Shocker: बेंगळुरूमध्ये सीटी स्कॅनवेळी वृद्ध महिलेचा लैंगिक छळ; आरोपी कर्मचाऱ्याला अटक
आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचेही पीडितेने सांगितले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिचा आणखी छळ केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले होते.
बेंगळुरूमध्ये सीटी स्कॅन दरम्यान एका वृद्ध महिलेचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. कोडगेहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अशोक असे आरोपीचे नाव असून तो हॉस्पिटलचा कर्मचारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी आजारी पडल्यानंतर महिलेला बेंगळुरू उत्तर भागातील एका नामांकित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपीने दुसऱ्या दिवशी पहाटे पीडित महिलेला सीटी स्कॅनसाठी नेले होते.
त्याने महिलेला कपड्यांशिवाय सीटी स्कॅन मशीनवर झोपण्यास सांगितले होते. ती झोपली असताना आरोपीने तिच्या अंगाला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. आरोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचेही पीडितेने सांगितले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिचा आणखी छळ केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलीसांनी घातल्या बेड्या)