Bengaluru Crime: बेंगळुरूमध्ये पार्क केलेल्या कारमधून 13 लाख रुपयांची चोरी; गुन्हा दाखल
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण लवकरच उघड होईल.
बेंगळुरूमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधून चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 14 लाखांच्या चोरीची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण लवकरच उघड होईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कार रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसत आहे. तेवढ्यात दुचाकीवरून आलेले दोन तरुण तेथे येतात. एक तरुण दुचाकीवरून खाली उतरतो आणि गाडीभोवती फिरतो. यानंतर तो ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी तोडून आत शिरला आणि गाडीत ठेवलेली बॅग घेऊन बाहेर आला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)