Bangalore vs Hyderabad: 'बेंगळुरू शहर सोडल्यावर होऊ लागली महिन्याला 40,000 रुपयांची बचत'; IT कंपनीमधील कर्मचाऱ्याचा दावा
पृथ्वी रेड्डी असे या तरुणाचे नाव असून, तो सॉफ्टवेअर अभियंता आहे.
‘बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद' हा वाद खूप जुना आहे. ही दोन्ही राजधानीची शहरे अनेक गोष्टींमध्ये प्रतिस्पर्धी आहेत. आता ही दोन्ही शहरे अनेक टेक दिग्गजांना आकर्षित करत आहेत. इथल्या मोठ्या प्रमाणातील आयटी गुंतवणूकीमुळे दोन्ही शहरे देशभरातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात. आता सोशल मिडियावर पुन्हा एकदा दोन्ही शहरांची तुलना सुरु झाली आहे. या साठीचा मुद्दा आहे दोन्ही शहरांमध्ये राहण्यासाठी येणारा खर्च. तर एका आयटी कंपनीमधील व्यक्तीने बेंगळुरूहून हैदराबादला शिफ्ट झाल्यावर आपली 40,000 रुपयांची बचत होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर दोन शहरांमधील लाइफस्टाइलबाबतच्या खर्चाची तुलना सुरु झाली आहे. पृथ्वी रेड्डी असे या तरुणाचे नाव असून, तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. पृथ्वी नुकतेच बेंगलोरहून हैद्राबादला शिफ्ट झाला आहे. (हेही वाचा: ATF Price Hike: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागण्याची शक्यता; एटीएफच्या किमतीत 14 टक्क्यांनी वाढ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)